Now Loading

अरुंद रस्ते करून राष्ट्रवादी च्या नगरसेवकांना काय साध्य करायचे आहे ....राजेश वाहुळे अंबाजोगाई : मागील चार वर्षाने बंद असलेले आंबेजोगाई शहरातील विकास कामे निवडणुका येताच अचानक मोठ्या प्रमाणात सुरू झाले विकासकामांना कोणाचाच विरोध नसताना विकास काम दर्जेदार व्हावे एवढीच इच्छा विरोधी पक्ष तथा संबंधित नागरिकांची असते परंतु प्रभाग क्रमांक 14 दलित वस्ती येथील माऊली नगर येथे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांन कडुन अचानक पणे रस्ता सुरू करण्यात आला परंतु ज्यावेळेस तेथील नागरिकांनी व आम्ही रस्त्याची पाहणी केली असता रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांसाठी दोन्ही बाजूला मिळून बारा फूट म्हणजेच अलीकडे सहा व पलीकडे 6 फूट एवढे अंतर सोडण्यात आले जेव्हा आम्ही संबंधित गुत्तेदाराला चौकशी केली असता संबंधित गुत्तेदार आणि इंजिनियर श्री लहाने साहेब व कोंडेकर साहेब यांनी दिलेल्या इस्टिमेट प्रमाणे आम्ही रस्ता करत आहोत असे उत्तर दिले तर संबंधित एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शोष खड्ड्या मुळे आम्ही दोन्ही बाजूला सहा फूट जागा सोडली आहे असे उडवाउडवीचे उत्तर दिले ज्या वेळी सर्व नागरिकांनी चौकशी केली असता खड्ड्यांचा मुद्दा इंजिनीयर ना गुत्तेदार यांनी काढला नव्हता आंबेजोगाई नगरपरिषदच्या इंजिनीयरने या रस्त्यावरून चार चाकी वळवून दाखवावी जर गाडी योग्य रीतीने वळली तर आमची हरकत नाही असे म्हणणे येथील नागरिकांचे आले रस्ता जर अरुंद करायचा होता तर रस्ताच का केला असे म्हणणे येतील नागरींकाचे आहे अंबाजोगाई नगरपरिषद च्या इंजिनियर ला विचारले असता त्यांनी फंड कमी आला असे उत्तर दिले पण फंड कमी असेल तर अरुंद रस्ता करून नागरिकांच्या जीवाशी हे नगरसेवक का खेळत आहेत हे प्रश्न उपस्थित होत आहे निवडणुकीच्या तोंडावर फक्त बिल उचलण्याचे प्रकार दिसत आहेत या टेंडर वर लोकजनशक्ती पार्टी लवकरच नगरविकास मंत्री यांना तक्रार करणार आहे 15/11/2021