Now Loading

मोटेगाव येथे लोकसहभागातून बांधला वनराई बंधारा

बीड केज- आझादी का अमृत महोत्सव या निमित्त मंडळ कृषी अधिकारी कार्यालय युसुफवडगाव आणि ग्रामपंचायत मोटेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभाग आणि त्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. केज तालुक्यातील मोटेगाव येथे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षा निमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला या निमित्त युसुफवडगाव मंडळ कृषी अधिकारी कार्यालय आणि ग्रामपंचात यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात जलसंवर्धन करून त्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी करण्याच्या उद्देशाने खर्च विरहित वनराई बंधारा बांधण्यात आला. हा वनराई बंधारा लोक सहभागातून श्रमदान करून बांधण्यात आला. या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी येवले, उपसरपंच नितिन बचुटे, कृषी सहाय्यक गोविंद टोपे, माळी साहेब, गणेश पारखे, शेळके, जाधव, श्रीमती लोणकर, तलाठी श्रीमती यमपुरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक आणि शेतकरी यांनी श्रमदान करून सहभाग नोंदविला.