Now Loading

धनेगाव च्या शेतकऱ्याचा रस्त्यासाठी आत्मदहनाचा इशारा

धनेगाव च्या शेतकऱ्याचा रस्त्यासाठी आत्मदहनाचा इशारा केज तालुक्यातील धनेगाव येथील राजकुमार अच्युतराव मुळे यांनी तहसील कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे भालगाव तालुका केज मध्ये सर्वे नंबर 57/3 मध्ये माझी आई रुक्मिणीबाई अच्युत मुळे यांच्या नावावर जमीन आहे.सदरील जमीनीमध्ये नंबर बांधाने रस्ता सर्वांच्या संमतीने देण्यात आला होता.त्याआधी 8 फूट जागा सोडण्यात आली होती आमच्या पुर्वेकडुन प्रभाकर देवराव थोरात यांनी रस्त्यासाठी 3 आर जमीन दिलेली आहे सदरील वहिवाटी साठी जो समाईक रस्ता दिलेला होता तरीपण बालासाहेब कोंडीराम हंडीबाग यांनी हा रस्ता आडवला आहे.यापुर्वीही रस्त्याच्या यासंदर्भात 5-6 महिण्याखाली तहसील कार्यालयास अर्ज देण्यात आला होता.तरी परिस्थितीचा विचार करून सदरील रस्त्याचा प्रश्न 10 डिसेंबर पूर्वी सोडवावा नसता आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.