Now Loading

प्रेस नोट राज्य शासकिय कर्मचारी यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने व पदोन्नती मिळण्यास सेवाजेष्ठतेनुसार व रिक्त पदांअभावी प्रदीर्घ कालावधी लागतो. त्यामुळे त्यांच्या 10. 20 व 30 वर्षांच्या सेवेनंतर तिन लाभांची सुधारीत सेवाअंतर्गत आश्वासीत प्रगती योजना ही शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेतन 1119/प्र.क्र.3/2019/सेवा-3 दिनांक 02 मार्च, 2019 अन्वये लागू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने, मा. जिल्हाधिकारी बीड यांनी सदर शासन निर्णयानुसार त्वरीत आढावा घेऊन 10, 20 व -30 वर्ष सेवेनुसार योजनेचा लाभ त्वरीत मंजूर करण्याबाबत अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आदेशीत करुन मार्गदर्शन केले. बीड जिल्हा महसूल आस्थापनेवर कार्यरत असलेले महसूल सहायक, अव्वल कारकून, तलाठी, मंडळ अधिकारी, लघुलेखक निम्नश्रेणी, वाहनचालक, शिपाई संवर्गातील कर्मचारी यांना 10, 20 व 30 वर्षांच्या सेवेनंतर पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या लाभाची सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेचे लाभ मंजूर करण्यात आलेले आहे. 10, 20 व 30 वर्षांचा सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ मिळाल्यामुळे संबंधीत महसूल कर्मचारी यांना वरीष्ठ वेतन श्रेणीमध्ये आर्थिक लाभ मिळणार असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच बीड जिल्हा महसूल आस्थापनेवर अनुकंपा तत्वावर 02 महसूल सहायक, 01 तलाठी व 01 शिपाई यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. सदर सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योनजेचा लाभ या अंतर्गत 10 वर्षाचा पहिला लाभ 93 कर्मचाऱ्यांना, 20 वर्षाचा दुसरा लाभ 33 कर्मचाऱ्यांना व 30 वर्षाचा तिसरा लाभ 27 कर्मचाऱ्यांना मंजूर झालेला आहे. वेतनामध्ये वाढ होऊन थकबाकीसह रक्कम मिळणार असल्याने व पदोन्नतीचा लाभ मिळणार असल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सदरची आश्वासीत योजनेची कार्यवाही मा. जिल्हाधिकारी बीड यांचे मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी बीड व उपजिल्हाधिकारी (भू.) जा.प्र. बीड यांनी केली आहे. (संतोष सऊते) निवासी उपजिल्हाधिकारी