Now Loading

जनावरांच्या कारणावरून दोघा भावास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड .अंबाजोगाई: शेतात जनावरे का येऊ दिले असे म्हणल्याच्या करणावरून दोघास बेदम मारहाण करून एकाचा हात मोडल्याची घटना तालुक्यातील लिंबगाव येथे मंगळवारी (दि. २३) घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. लिंबगाव येथील सतीश मोकींदा काळे (वय: ५०) व त्यांचा भाऊ दत्ता काळे यांनी आरोपींना शेतात जनावरे का येऊ दिली असे विचारले असता आरोपींनी दोघांनाही बेदम मारहाण केली. सतीश काळे यांच्या उजव्या हातावर मनगटाच्या वर मारून हात मोडला व गंभीर दुखापत केली. तसेच दत्ता काळे यास आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुका मार दिला. सर्व आरोपीने मिळून दोघा भावांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सतीश मोकींदा काळे यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण कोंडिबा काळे, राजेभाऊ बाबू शेळके, शिवाजी राजेभाऊ शेळके, विनोद लक्ष्मण काळे, सुरज उर्फ बबलू लक्ष्मण काळे (सर्व रा. लिंबगाव) यांच्याविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक जमादार पुढील तपास करीत आहेत.