Now Loading

हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गजानन गाडेकर यांची निवड

दि 24 तालुक्यातील मौजे करंजी नवीआबादी येथील शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. तालुक्यातील मौजे नवीआबादी करंजी येथील शालेय व्यवस्थापन समितीची सर्व पालकांच्या उपस्थितीत नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गजानन गाडेकर,तर उपाध्यक्षपदी सविता पुट्टेवार यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मुख्याध्यापक एल. जी. कोंढेकर, शिक्षक शिवाजी गाडेकर,माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नासरखा पठाण, राजेश्वर पवार, दिलीप गाडगेराव, माधव गाडेकर, प्रसाद गाडेकर, दादाराव परभणकर , विकास गाडेकर, अरुण गाडेकर,शिवनंदा येवले, नंदाबाई जाधव, गंगासागर उमाटे  अदी पालक उपस्थितीत होते