Now Loading

दलित मजुराचा तोडला हात

मध्यप्रदेशातील डोलगाव इथं गणेश मिश्रा यांच्या घर बांधकामाचा हिशेब करण्यासाठी पडरी इथं राहाणारे अशोक साकेत व सतेंद्र साकेत हे दलित तरुण गेले होते. या हिशेबाच्या चर्चेत अशोक आणि गणेश यांच्यात पाच हजारांवरुन भांडण झाले. हे भांडण इतकं विकोपास गेलं की गणेश यांनी अशोक यांच्यावर स्वतःच्या तलवारीने हल्ला केला त्यामुळे अशोक यांचा हातच तुटला. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी हात पुन्हा जोडला आहे. आता या मजुराच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. रेवा जिल्ह्यातील सिरमौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोलगाव इथल्या अशोक साकेत यांचा हात तोडण्याची ही घटना आहे. 20 नोव्हेंबर रोजी 5000 रुपयांची मजुरी मागण्यातून झालेल्या वादात अशोक यांचा हात तोडला होता.