Now Loading

*बालदिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे केज येथे बक्षीस वितरण संपन्न.*

*बालदिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे केज येथे बक्षीस वितरण संपन्न.* ================================= बीड केज सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, केज , शिक्षकांची सहकारी पतसंस्था व वसंत शिक्षक व शिक्षकेत्तर पतसंस्था म.केज यांच्या संयुक्तपणे आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने मा. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु जयंती निमित्त दि.१४ नोहेंबर २०२१ रोजी आयोजित बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा दि. २२ मे २०२१ रोजी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, केज यांच्या कार्यालयात आर.एम. मोटे, सहाय्यक निबंधक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर स्पर्धेत प्रथम १००१ रू. चे पारितोषिक कु.दिया दिलीप भुतडा, द्वितीय ७०१ रू पारितोषिक चि. पृथ्वीराज शिंदे, तृतीय पारितोषिक ५०१ चि.साईराज खोडसे तर उत्तेजनार्थ ३०१ चे पारितोषिक कु. स्वराली विजयराज आरकडे हिला मिळाले. चित्रकला बक्षीस वितरणावेळी बी.एस. पाटील, एस. एन. शिंदे, जी. यू. कुटे, सी.जी,शिंदे, आर एस. पवार,के .बी. मुंडे, पि.एस. रोडे तसेच शिक्षक पतसंस्थेचे बळीराम जाधव, बाळासाहेब साखरे,खोडसे सर, पत्रकार व्ही.बी.आरकडे व पालक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.