Now Loading

शेती पंपाची सक्तीची वीज कनेक्शन तोडणी थांबवा ---भाई मोहन गुंड* *विजे मुळे नुकसान झालेल्या पिकाची महावितरणने भरपाई द्यावी,*

*शेती पंपाची सक्तीची वीज कनेक्शन तोडणी थांबवा ---भाई मोहन गुंड* *विजे मुळे नुकसान झालेल्या पिकाची महावितरणने भरपाई द्यावी,* ==≠=============================≠== बीड केज मागील पंधरा दिवसा पासून विद्युत वितरण कंपनी कडून कृषी पंपाच्या थकीत वीज बिल वसुली साठी शेती पंपाचे कनेक्शन विविध भागात तोडणी चालू आहे. मात्र शेतकऱ्याच्या आर्थिक बाजूची थोडी तरी जाणीव करुन सक्तीची विज कनेक्शन कट करणे थांबवा. अशी मागणी बीड विद्युत वितरण अभियंता यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की अतिवृष्टीने हाताला आलेली पीक जमीन दोस्त झाली खरीपाचा हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेला रब्बी पिकाच्या उत्पन्नातून तरी चार पैसे मिळतील त्या उत्पादनातून चार पैसे हातावर येताच शेतकरी वीज बिल भरतील शेतकरी अडचणीत असल्यामुळे बिल भरू शकत नाही. सक्तीची वीज बिल वसुली थांबवा शेतकऱ्यांची वीज तोडणे आगोदर शेतकऱ्यांना लेखी नोटीस दिल्या शिवाय कुठल्याच शेतकर्याचे पंपाचे कनेक्शन कट करु नये ,जर हे थांबवणार नसाल तर शेती पिकांच नुकसान झालं ते विधुत वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, एका डी पी वारील थकबाकी साठी संपुर्ण फिटर बंद करु नका. अन्याथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. भाई अॅड. नारायण गोले, अॅड.भाई संग्राम तुपे, भाई अशोक रोडे , भाई अर्जुन सोनवणे , भाई भिमराव कुटे, भाई मुकुंद शिंदे, निलेश थिटे, अमोल सावंत, नावनाथ जाधव, अनिल कदम, मुजाबा. पांचाळ, वजीर शेख, सुमंत उंबरे, बाळु तरकसे, मंगेश देशमुख, बाबा गायकवाड, डिगाबर मगर, महेश गायकवाड, राजेभाऊ पौळ इतर पक्षाचे कार्यकर्ते ऊपस्थित होत