Now Loading

संदीप मानकर यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषद या मातंग समाजातील अग्रगण्य असलेल्या सामाजिक संघटनेच्या युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संदीप दादाराव मानकर यांची निवड करण्यात आली आहे. मानकर यांनी आतापर्यंत राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात अनेक पदे भूषविली असून जिल्ह्यात त्यांचा तगड़ा जनसंपर्क आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी त्यांची युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड केली आहे. संघटना बळकटीसाठी आणि समाजातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आणि कृतीशील राहील असे प्रतिपादन मानकर यांनी केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, प्रशासकीय अशा सर्वच क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.