Now Loading

शासकीय योजनांच्या कामामुळे मनरेगा विभागातील कर्मचाऱ्यांचे चांगभले!!!! देवणी: तालुक्यात प्रत्येक गावात नरेगा मार्फत अनेक प्रकारचे कामे चालू आहेत ? होती ? व ती पूर्ण झाले आहेत पण त्त्या काही कामावर मजूर काम करत नाहीत पण बिले मात्र मजुरांच्या नावावर उचले जाते? त्या पाठीमागे खंबीरपणे पणे कोणीतरी साथ देत आहे हे नक्कीच. नरेगा मार्फत अनेक विहिरीचे काम कामे चालू आहेत पण एकाही मजुराने काम केले नाही मात्र मनरेगा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आशीर्वादाने बिले मात्र मजुरांच्या नावावर निघाले जाते त्यात प्रमुख जबाबदार कोण? अनेक ठिकाणी वन विभागाच्या वतीने वनामध्ये कामे केली जातात व अनेक ठिकाणी रोपवाटिकेचे काम चालू आहे त्या ठिकाणी अनेक बोगस मजूर दाखवून वनाधिकारी यांचा शुभ आशीर्वाद घेऊन त्यांना सर्वोतपरी भ्रष्टचार करण्यास मदत करतात हे मात्र नक्की अनेक ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत ग्राम पंचयतीमध्ये अनेक प्रकारचे कामे पूर्ण झाली आहेत पण तेथे एकही मजूर काम केलेलं नाही परंतु सरपंच व ग्रामसेवक तसेच खासगी गुत्तेदार यांना हाताशी धरून त्यांचे बिले बोगस मजूर दाखवून अनेक प्रकारचे बिले काढण्याचा गोरख धंदा नरेगा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचारी करत आहेत.