Now Loading

हिंगोलीत शेतकऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री यांनाच नक्षलवादी होन्याची मागितली परवानगी. हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऐन पिकाची काढणीची वेळ अन अशातच अतीवृष्टी ,मुसळधार पावसाने महिनाभर मुक्काम ठोकल्या ने हिंगोली जिल्ह्यात नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहु लागल्याने पुरजण्य परीस्थिती निर्माण झाली असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला होता तर अनेक गावालगतच्या नदीचे पाणी घरात शिरले होते यामुळे शेतातील सोयाबीन, उडीद, मुग, कापुस पुर्णता पाण्याखाली गेल्याने पिकाला मोड आले होते तर अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्याच्या सुड्याच पाऊसाच्या पाण्याने वाहुन गेल्या होत्या यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता.शेतीपिकाचे नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अपुरी मदत शेतकऱ्यांना दिली गेली आणि आता आशा होती रब्बी हंगामातील पिकाची त्यावरही विजवितरणाच्या मनमानी कारभारामुळे महावितरणाकडुन शेतकऱ्यांच्या शेतामधील पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने हतलब झालेल्या सेनगाव तालुक्यातील मौजे ताकतोडा येथील पन्नास शेतकरी आणि गाव चालविणाऱ्या सरपंचाने एकत्र येत सेनगाव तहसिलदारांन मार्फत थेट मुख्यमंत्री यांना निवेदन देत चक्क गावातील सर्व शेतकरी,गावकरी, महिला, मुलांना नक्षलवादी होन्याची परवानगी मागितली आहे.ताकतोडा येथील परेशान झालेल्या शेतकऱ्यांनी नक्षलवादी होन्याची परवानगी मागितल्याची आफलातुन मागणी केल्याने हिंगोली जिल्ह्यातील अजुन किती गावातील शेतकरी वेगळी मागणी करणार अशी चर्चा सुरू आहे.