Now Loading

भाजप ओबीसी मोर्चा च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राजु देवतळे यांची नियुक्ती.

चंद्रपूर:- भाजप ओबीसी मोर्चा चे राज्यात संघटन वाढवून ओबीसी चे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व ओबीसी चा प्रवाह भाजप मध्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिकेकर यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदी राजु देवतळे यांची नियुक्ती नुकतीच केली आहे.  भाजप च्या प्रवाहात तीन वर्षांपासून सातत्याने राजु देवतळे हे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनातून कार्य करीत असताना ते भाजप जिल्हा सचिव पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कामाची गती पाहून जिल्ह्यातील घरकुल व इतर समस्या सोडवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण विकास सनियंत्रण समितीचे अशासकिय सदस्य म्हणून कार्यरत आहे. ते उत्तम प्रवक्ते असून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी चे कार्यकारणी सदस्य आहेत.      भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी राजु देवतळे यांची नियुक्ती झाल्याचे श्रेय त्यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना दिले. चिमूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.