Now Loading

अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यांवर चिमूर पोलिसांची कार्यवाही 81 हजार रु.चा मुद्देमाल जप्त

चिमूर तालुक्यातील नेरी येथून देशी दारूची मोठ्या प्रमाणात परिसरातील गावात अवैधरित्या वाहतूक व विक्री सुरू असल्याची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यांवर धाड टाकली. या कार्यवाहीत अंदाजे 81 हजार रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ग्रामीण भागात दारूचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अशी माहिती नेरी पोलीस चौकी इन्चार्ज ए. पी. आय. मंगेश मोहोड व सहकारी यांना लागताच दि.21/11/21रोजी सायंकाळी 7.00 वा. च्या दरम्यान नेरी हद्दीत धडक कारवाई केली.गोंडेदा ते वडसी रोडवर आरोपी मुकेश गजानन सोनुले ( वय 25 वर्ष रा. गोंडेदा ) मोहित सुधीर कोटरंगे ( वय 21 वर्ष रा. केवाडा ) हे नवीन होंडा शाइन (नंबर नसलेली) मोटरसायकलने 26 देशी दारु पावट्या ( प्रत्येकी 90 मिली.) वाहतूक करताना मिळून आले. सदर आरोपींचे ताब्यातून नवीन होंडा शाइन (नंबर नसलेली) मोटरसायकल किंमत अंदाजे रू.80,000/- 2) 26 देशी दारु पावट्या ( प्रत्येकी 90 मिली किंमत अंदाजे रू.1,300/-) असा एकूण रू.81,300/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन पोलिस स्टेशन ला आरोपींविरुद्ध कलम 65 (अ), 83 ( म.दा.का. ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कार्यवाही पो.नि. मनोज गभने यांचे मार्गदर्शनामध्ये ए. पी. आय.मंगेश मोहोड, कर्मचारी प्रमोद पढाळ, प्रमोद गुट्टे यांनी केली.