Now Loading

कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना

कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना एक लाख रुपये द्या महसूलमंत्री थोरात यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : कोरोनाच्या महामारीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करणे शक्य नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. मात्र राज्य सरकारने १ लाख आणि केंद्र सरकारने ३ लाख असे मिळून ४ लाख रुपये मृतांच्या वारसांना देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने स्वतःचा हिस्सा देण्याची भूमिका केंद्र सरकारला कळवावी, अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान राज्य सरकारच्या राज्य आपत्ती मदतनिधी मधून दिले जावे, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने ११ सप्टेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात दिले होते. महामारीमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा नागरिकांची काळजी घेणे आपली जबाबदारी एक कल्याणकारी राज्य म्हणून गरजेच्या वेळी आपल्या नागरिकांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ३ लाख रुपयांची मदत केंद्र सरकारने द्यावी आणि उर्वरित २५ टक्के म्हणजे १ लाख रुपये राज्य सरकारने द्यावेत. यामुळे आपण आपल्या नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा त्यांचा हक्क देण्यात यशस्वी होऊ, असेही थोरात यांनी पत्रात म्हटले आहे. बळी गेला. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्ण बिघडले. अनेकांची आयुष्यभराची कमाई या महामारीने संपवून टाकली व असंख्य कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. अशा परिस्थितीत केवळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे.