Now Loading

डोंबिवलीत रिक्षातून प्रवासादरम्यान मोबाईल लंपास

रिक्षातून प्रवास करण्याचा बहाणा करून सह प्रवाशांनी खिशातील 23 हजार रुपये किंमतीचा नवीन मोबाईल फोन लंपास करणाऱ्या तीन अनोळखी चोरां विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकुर्ली येथील बालाजी अंगण येथे राहणारे दीपक डोळस यांना डोंबिवली चार वाजता येते डॉक्टर कडे जाण्यासाठी काल सकाळी त्यांनी रिक्षा पकडली.त्यांच्या रिक्षात शेलार नाका येथे अन्य दोन प्रवासी बसले .ही रिक्षा टिळकनगर पोस्टऑफस जवळ पोहचताच ते दोन प्रवासी रिक्षातून उतरले तर त्यांचा तिसरा साथीदार मोटरसायकल वरून मागे येऊन मला माझा फोन टिळकनगर चौकात पडल्याचे सांगितले. तेव्हा डोळस यांना त्यांचा मोबाईल खिशात सापडला नाही म्हणून ते तात्काळ मोबाईल शोधण्यासाठी तेथे धावत गेले , पण तेथे काही मोबाईल सापडला नाही. त्यामुळे ते पुन्हा रिक्षावाल्याकडे आले असता सदर दोन प्रवासी व तो मोटरसायकल चालक तेथून बेपत्ता झाल्याचे दिसून आले.अखेर आपली फसवणूक करून मोबाइल चोरल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या तीन अनोळखी व्यक्तींवर टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला . -----