Now Loading

14 वर्षीय मुलावर तरुणीने केला लैंगीक अत्याचार ,पीडित मुलाच्या 16 वर्षीय बहिणीवर तरुणीच्या प्रियकराने केला लैंगिक अत्याचार

कोलशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ,पोलीस तपास सुरू कल्याण मध्ये एक धक्कादायक लैगिक विकृत प्रकार उघडकीस आला आहे . एका तरुणीने 14 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला तर या तरुणीच्या प्रियकराने या पीडित अल्पवयीन मुलाच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे .अल्पवयीन मुलावर अत्याचार करणारी तरुणी त्याची नातेवाईक आहे .या प्रकरणी विकृत तरुण व तरुणी विरोधात कोलशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे . कल्याणात लैगिंक विकृतीची एक विचित्र घटना समोर आली आहे .कल्याण पूर्व परिसरात हा प्रकार घडला आहे .एका अल्पवयीन भाऊ बहिणीची व्यथा ऐकून पोलीस सुद्धा स्तब्ध झाले .पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर एक 23 वर्षीय तरुणी सातत्याने लैगिंक अत्याचार करीत होती. ही विकृत तरुणी पिडीत अल्पवयीन मुलाची नातेवाईक आहे. आरोपी तरुणी इथेच थांबली नाही तिने तिच्या प्रियकराला पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैगिंक अत्याचार करण्यास भाग पाडले. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता या दोघांची विकृती वाढत होती .अखेर दोन्ही पिडीत भावा बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली या तक्रारी नुसार पोलीसानी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे