Now Loading

जम्मू-काश्मीरः श्रीनगरच्या रामबागमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार

श्रीनगरच्या रामबाग भागात शुक्रवारी दुपारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. चकमक थांबली असली तरी सुरक्षा दलाचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. श्रीनगरचे आयजी विजय कुमार यांनी तीन दहशतवाद्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. सुरक्षा दलांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. बुधवारी दुपारी राजबाग परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांसह परिसरात संयुक्त शोध मोहीम सुरू केली.
 

अधिक माहितीसाठी: India TV | Deccan Herald