Now Loading

आशा कार्यकर्ती आणि गट प्रवर्तक यांची बैठक संपन्न

बीड .अंबाजोगाई : येथील वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र येथे आशा कार्यकर्ती आणि गट प्रवर्तक यांची दि. 22 रोजी बैठक आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकीस जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम बीड चे मनोविकार तज्ञ डॉ. सुदाम मोगले आणि त्याची टीम हजर होती. यावेळी बोलताना डॉ. मोगले यांनी विविध मनोविकार आणि उपचार यावर मार्गदर्शन केले. महीन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी त्याची टीम सदर रुग्णालयात मनोविकार सेवा देणार असे सांगितले तसेच त्यांनी मनोविकार औषधी पण देऊन रुग्णाला तात्पुरता उपचार सुरू करण्यास सांगितले. यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी चालु करण्यात आले असुन विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध असुन या बाबत सर्व आशानी आपल्या गावातुन जनजागृती करावी असे आवाहन केले. या कार्यक्रमास स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. आरूणा केंद्रे, डॉ. दिलीप गायकवाड, अधिसेविका कावळे मॅडम, सर्व इंचार्ज सिस्टर आणि कर्मचारी हजर होते. या कार्यक्रमचे आयोजन समाजसेवा अधिक्षक विभागाचे गुणवंत रसाळ आणि एस. आर. जानराव यांनी केले.