Now Loading

रायबरेली: सोनिया गांधींच्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका, आमदार आदिती सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना मोठा झटका बसला आहे. येथून काँग्रेसच्या बंडखोर आमदार अदिती सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत बसपच्या वंदना सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मायावतींनी वंदना यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी आदिती सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणे काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो. आदिती दीर्घकाळापासून काँग्रेसला विरोध करत आहेत.