Now Loading

केज तहसील कार्यालयासमोर रिपाईचे धरणे

केज तहसील कार्यालयासमोर रिपाईचे धरणे केज, दि. २४ : तालुक्यातील लव्हुरी येथील अतिक्रमित गायरान जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवावे आणि एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी रिपाई तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील लव्हरी येथील गायरान जमिनीवर मागासवर्गीय भूमिहीन अतिक्रमण करून कसत आहेत. त्या अतिक्रमित गायरान जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्या संदर्भात लव्हुरी येथील काही अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमित जमिनीवर कोणताही प्रकल्प उभारू नये. असे आदेश दिलेले असतानाही; त्या आदेशाचे दखल न घेता सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. त्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्यात यावे. या मागणीसाठी दि. २३ नोव्हेंबर रोजी तालुका जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशा वरून अध्यक्ष दीपक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे व सल्लागार उत्तम मस्के, पान ५ वर