Now Loading

Mumbai: मोबाईल अँपवरून लोकल ट्रेनची तिकिटे मिळणार, २४ नोव्हेंबर पासून सेवा सुरू

आता कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी नवीन आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या प्रवाशांना कोरोनाचे दोन्ही डोस मिळाले आहेत ते आता रेल्वेच्या अनारक्षित तिकीट प्रणाली अँप (UTS अँप) द्वारे मुंबई लोकल ट्रेनचा सिंगल प्रवास आणि सीझन तिकीट त्यांच्या मोबाइल फोनवर बुक करू शकतात. हेअँप महाराष्ट्र सरकारने युनिव्हर्सल पास प्रणालीशी जोडले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, UTS अँप आणि युनिव्हर्सल पास प्रणालीच्या एकत्रीकरणामुळे प्रवासी कोणत्याही त्रासाशिवाय तिकीट बुक करू शकतात.