Now Loading

धुळे तालुक्यातील रस्ते देखभाल दुरुस्तीच्या  आ. कुणाल पाटील यांच्याकडून सूचना

धुळे  धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून धुळे तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झालेल्या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील संबधित अधिकारयांना दिल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांची गैरसोय दूर होवून प्रवासात होणारा त्रास कमी होणार आहे. धुळे तालुक्यातील रस्त्याच्या कामांना प्राधान्य देत आ.कुणाल पाटील यांनी गावागावाला जोडणारे महत्वाच्या रस्त्यांसह पुलांच्या कामासाठी निधी आणून रस्त्यांची व पुलांची कामे उत्तम दर्जाने पूर्ण करुन घेतली आहे. आज तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते चांगल्या अवस्थेत असून नवीन तसेच राहिलेल्या रस्त्यांच्या कामांचाही आराखडा तयार करुन मंजुरीसाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान धुळे तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आ. कुणाल पाटील यांनी अनेक रस्त्यांची कामे मंजुर करुन पूर्ण करुन घेतली आहेत. मात्र रस्ते पूर्ण झाल्यानंतर वर्ष दोन वर्षात सततचा वापर आणि अतिपावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडणे, ठिकठिकाणी रस्त्याचे काम उखडून जाणे, रस्त्याच्या साईड पट्ट्या कमी होवून नामशेष होणे तसेच पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा झाडे झुडपे वाढल्याने वाहनधारकांना वाहन चालवतांना अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे रस्ते खराब शेतकरी, प्रवाशी तसेच वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दुर्दैवाने अपघाताची शक्यता असते.त्यामुळे प्रवास सुखमय आणि सोयीस्कर व्हावा म्हणून रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभालीच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी दिल्या आहेत. दुरुस्ती बाबतची मागणी ग्रामस्थ व कार्यकत्र्यांनी केली होती. नगाव सायने नंदाणे रस्ता (१५.५० कि.मी.), बोरकुंड नंदाळे रस्ता (४.५० कि.मी.), नेर- बोरीस रस्ता (२१.८४ कि.मी.), वलवाडी-वडेल-निकुंभे रस्ता (१९.७७ कि.मी.), फागणे- वरखेडी, वणी-शिरडाणे,विश्वनाथ ते मोहाडी प्र.डा. रस्ता(१८.०६कि.मी.), बोरविहीर-हडसुणे-विसरणे ते मोरदड तांडा (१८.६५कि.मी.), आर्वी ते नंदाळे रस्ता (१६.७५कि.मी.), नगाव-धमाणे रस्ता (५.०४ कि.मी.), बोरकुंड-नाणे रस्ता (४.३ कि.मी.), रावेर-धनगरपाडा- दिवाणमळा (५.५ कि.मी.), फागणे ते बोधगाव रस्ता (१८.०१ कि.मी.), फागणे ते जिल्हा हद्द सावळी तांडा रस्ता (१७.०९ कि.मी.), रा.मा.- (खेडे) ते सोनेवाडी रस्ता (१३.७९ कि.मी.), रा.मा.६ते भदाणे रस्ता (२.५२ कि.मी.), बुरझड ते वडणे रस्ता(१.५ कि.मी.), लामकानी ते नवे कोठरे रस्ता (१.७७ कि.मी.), सावळदे ते रानमळा ते तिखी रस्ता (४.१६ कि.मी.), रा.मा.२१ ते डेडरगाव रोड (५.४ कि.मी.), शिरडाणे प्र.डा.ते वडगाव रस्ता (२.३९ कि.मी.) असे धुळे तालुक्यातील एकूण २०७.४६ कि.मी.अंतराची रस्त्यांची दुरुस्ती व देखभालीच्या सूचना दिल्या आहेत. अधिक्षक अभियंता विनोद भदाणे, कार्यकारी अभियंता सौ.स्नेहल पगार, उपअभियंता वाणी यांच्याशी दूरध्वनीव्दारे चर्चा करुन रस्त्याची दुरुस्ती व देखभाल करण्याच्या सूचना आ.कुणाल पाटील यांनी दिल्या आहेत.