Now Loading

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांना ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण

नाशिक - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांना ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी नाशिकमध्ये होणारे हे संमेलन यशस्वी होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रसिद्ध लेखक आणि कलावंत नामदेव व्हटकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. साहित्य संमेलनात त्यांची नोंद घेतली जावी अशी अपेक्षा उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या वादापासून संयोजन समितीने दूर राहून संमेलन यशस्वी करण्याकडे लक्ष द्यावे अशी सूचना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. राजकारण आणि साहित्य हे वेगळे कधीच नसते. साहित्यिकांचेही राजकारण आपण पाहिले आहे. संमेलनाकडून सर्वच घटकांच्या अपेक्षा असतात. त्यांना प्रतिसाद देताना आपल्या क्षमतांचा विचार करावा असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वागत समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील , कार्यवाह प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे , संजय करंजकर, सुभाष पाटील , भगवान हिरे हे उपस्थित होते.