Now Loading

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अभिवादन

नाशिक (दि.२५) - भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर येथील पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विशेष कार्याचा उल्लेख शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केला. यशवंतराव चव्हाणांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. लोकशाहीचे विकेंद्रीकरण आणि पंचायत पद्धती, शैक्षणिक, कृषी आणि औद्योगिक यासारख्या दूरगामी निर्णयाचे महत्व आज सर्वांसमोर आहे. त्यांनी विविध क्षेत्राकरिता जे निर्णय घेतले ते झाले नसते तर आजच्या महाराष्ट्रात अनेक क्षेत्रांत असमतोलाचे चित्र दिसले असते. प्रखर बुद्धिमत्ता व दूरदृष्टी असलेल्या या नेत्याच्या पुरोगामी विचारांवर महाराष्ट्र राज्य आजही काम करीत आहे. शेतकऱ्याच्या कल्याणासाठी त्यांनी सहकाराची मुहर्तमेढ रोवली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार यांनी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्याच विचारधारेवर राष्ट्रवादी पक्षाची स्थापना करून पुरोगामी महाराष्ट्राकरिता राष्ट्रवादी पक्ष कार्य करताना दिसत आहे. यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, महेश भामरे, ऐश्वर्या गायकवाड, डॉ. अमोल वाजे, धनंजय राहणे, बाळासाहेब जाधव, राजेंद्र शेळके, संजय पगारे, निलेश सानप, योगिता आहेर, स्मिता चौधरी, संगिता सानप, रिटा माहेश्वरी, विद्या रिजाल, प्रतीक आहेर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.