Now Loading

IND vs NZ 1st Test: भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, श्रेयस अय्यरने पदार्पण केले

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ऐतिहासिक ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यर आज न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करणार आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अय्यर यांच्याकडे कसोटी कॅप दिली. या सामन्यात शुभमन गिलला सलामीवीर संघात स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी त्याला मधल्या फळीत ठेवण्यात आले होते. मात्र केएल राहुलला दुखापत झाल्यामुळे गिलला आजच्या सामन्यात सलामीवीर म्हणून ठेवण्यात आले आहे. शुभमन गिल आणि हनुमा विहारी ही जोडी आज न्यूझीलंडविरुद्ध ओपनिंग करेल.
 

अधिक माहितीसाठी - TV 9 | News 18