Now Loading

हरियाणाच्या यमुनानगरमधील रद्दीच्या गोदामाला भीषण आग, तीन मुलांसह वडिलांचा मृत्यू

यमुनानगर शहरातील सिटी सेंटर पार्कजवळील रद्दीच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. पहिल्या मजल्यावरील खोल्यांमध्ये ज्वाला हळूहळू पसरल्या. यामध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक महिला गंभीर भाजली आहे. लोकांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक उठले. त्यानंतर अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या अनेक बंबांनी काही तासांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला होता.