Now Loading

चिमूर नप च्या मंजूर घरकुले धूळ खात, नप चे दुर्लक्ष.. कांग्रेस शहर मीडिया प्रमुख पप्पू शेख यांचा आरोप

चंद्रपूर:- चिमूर नगर परिषद च्या पहिल्या पंचवार्षिक कार्यकाळात पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ६९५ घरकुले मंजूर झाली असताना मात्र अजून पर्यत सुद्धा घरकुल बांधकामे कार्यान्वित न झाल्याने लाभार्थी मध्ये नाराजी व्यक्त होत असल्याने मंजूर घरकुल धूळखात पडल्याचे सांगत नप प्रशासन चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चिमूर शहर कांग्रेस मीडिया प्रमुख पप्पू शेख यांनी केला. चिमूर नगर परिषद अंतर्गत क्षेत्रातील गोरगरीब नागरिकांनी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल मिळण्यासाठी प्रस्ताव नप ला सादर केला होता. त्यात त्यांचे वेळ आणि आर्थिक खर्च झालेला होता. अनेक लाभार्थ्यांनी आपापले प्रस्ताव सादर केले असता त्यात ६९५ लाभार्थ्यांचे घरकुले मंजूर झाले. मंजूर प्राप्त घरकुले बांधकाम कार्यान्वित करण्यासाठी लाभार्थी टक लावून पाहत असून नप कडे जाऊन चकरा मारीत आहेत.परंतु उडवाउडवीची उत्तरे देत असून लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र शासन व राज्य शासन कडून मंजूर झाले असताना मात्र केंद्र सरकार निधी देत नसल्याचा आरोप करीत नप पाठपुरावा करीत नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ६९५ घरकुले मंजूर प्रस्ताव कोठे धुळखात पडले हा प्रश्न निर्माण होत असून याकडे नप प्रशासन चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कांग्रेस चिमूर शहर मीडिया प्रमुख पप्पू शेख यांनी केला असून मंजूर घरकुल बांधकामे करण्याची मागणी केली आहे.