Now Loading

नाशिक-पुणे महामार्गाबाबत रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक-पुणे महामार्गाबाबत मोठी घोषणा ट्विटरद्वारे द्वारे केली आहे. गेल्या दोन दशकां पासून नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाची चर्चा होत आहे.वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाशिक-पुणे महामार्गाचे काम हे विविध टप्प्यांमध्ये केले जात आहे. त्यात नाशिक ते सिन्नर, सिन्नर ते संगमनेर, संगमनेर ते खेड, खेड ते पुणे या टप्प्यांचा समावेश आहे. संगमनेर आणि सिन्नर या दोन्ही शहरांलगत बायपास विकसीत करण्यात आला. तो सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळत आहे. मात्र, अद्यापही आळे फाटा, नारायण गाव आणि खेड याठिकाणी महामार्गाचे रुंदीकरण होऊ शकलेले नाही. भूसंपादनाच्या अडचणीसह महामार्गाचा मंजूर नकाशा याबाबत अनेक प्रश्न आणि समस्या होत्या. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीही वेळोवेळी वविध मागण्या केल्या.त्यानुसार, नाशिक फाटा ते खेड या दरम्यानच्या महामार्गाच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.तशी माहिती गडकरी यांनी दिली आहे