Now Loading

वर्धा शहर युवा आघाडी अध्यक्षपदी दिनेश पांडे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे व राष्ट्रीय महासचिव डा मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने विदर्भ प्रदेश तथा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर) पक्षाचे वर्धा शहर युवा आघाडी अध्यक्ष पदी दिनेश पांडे यांची आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी नियुक्ती केली आहे. नियुक्ती बद्दल रिपाइं (आंबेडकर) चे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष कैलाश इंगळे, जिल्हा युवा आघाडी महासचिव अंकीत रामटेके, जिल्हा युवा आघाडी उपाध्यक्ष शुभम कांबळे, रिपाइं (आंबेडकर)चे जिल्हा संघटक समाधान पाटील, तालुका अध्यक्ष सुनिल वनकर , सचिव फुलचंद नाखले आदीं पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.