Now Loading

तलासरी नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले १७ प्रभांगासाठी २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबरला निकाल

पालघर : राज्यातील १०५ नगरपंचायत निवडणूकींची राज्य निवडणूक आयोगाने काल घोषणा केली असून  निवडणूक होणार्‍या क्षेत्रात तात्काळ आचारसंहीता लागू करण्यात आली आहे.यामध्ये पालघर जिल्ह्यातील तलासरी,विक्रमगड आणि मोखाडा या तीन नगरपंचायतींचा समावेश असून प्रत्येकी १७ प्रभागांसाठी २१ डिसेंबरला मतदान पार पडणार असून २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर प्रथमच इतकी मोठी निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष ही निवडणुक जिंकण्यासाठी कामाला लागले आहेत. पालघर जिल्ह्यातील तलासरी नगरपंचायतीचा कार्यकाळ २६ डिसेंबरला संपत असून एकूण १७ प्रभागांसाठी २१ डिसेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे.१ ते ७ डिसेंबर पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशपत्र दाखल करता येणार असून ८ डिसेंबरला छाननीनंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होऊन लगेचच प्रचाराला सुरवात होणार आहे.२०१६ साली प्रथमच पार पडलेल्या तलासरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एकूण १७ पैकी ११ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते.तर भाजप ४ जागा आणि राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाला २ जागांवर समाधान मानावे लागले होते.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्मिता वळवी यांची नगराध्यक्षपदी तर सुरेश भोये यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली होती. तलासरी शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या एकूण १८७२२ असून यामाध्ये अनुसूचीत जमातीची १२९९८ लोकसंख्या सर्वाधिक आहे. तलासरी शहर आणि तालुका हा मागील अनेक दशकांपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे.माकपचा हा परंपरागत बालेकिल्ला उध्वस्त करण्यासाठी शिवसेनेसह ,राष्ट्रवादी व भाजप पक्ष जोरदार तयारी करीत असली तरी अद्याप पर्यंत तरी म्हणावे तसे यश कुठल्याही पक्षाला मिळू शकलेले नाही. दोन दिवसांपूर्वी संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांच्या उपस्थितीत माकपमधून राष्ट्रवादीत गेलेले सुधीर ओझरे गट आणि काही माकप कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पहीला धक्का दिला आहे.भाजप मधील पहील्या फळीतील जेष्ठ नेते खासदार चिंतामण वणगा,माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे आणि जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांच्या अकस्मात निधनाने भाजपचे मागील तीन वर्षात मोठे राजकीय न भरून येणारे नुकसान झाले असून त्यामुळे भाजपची तलासरीतील ताकद कमी झाली आहे.त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीमध्ये खरी लढत ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोबत  शिवसेना,भाजप, राष्ट्रवादीची लढत रंगण्याची शक्यता आहे. प्रभाग क्र.           आरक्षण प्रवर्ग १.            अनुसूचीत जमाती-स्त्री २            .अनुसूचीत जमाती ३.            अनुसूचीत जमाती ४.             सर्वसाधारण-स्त्री ५.         अनुसूचीत जमाती-स्त्री                                     ६.अनुसूचीत जमाती-स्त्री ७.अनुसूचीत जमाती-स्त्री ८.   सर्वसाधारण ९.       अनुसूचीत जमाती १०.            सर्वसाधारण ११.           अनुसूचीत जमाती १२.           अनुसूचीत जमाती १३.           अनुसूचीत जमाती १४.           अनुसूचीत जमाती-स्त्री १५.           अनुसूचीत जमाती-स्त्री १६.           सर्वसाधारण-स्त्री १७.           सर्वसाधारण-स्त्री