Now Loading

डोंबिवली क्रिडा संकुलातील तरण तलाव  स्वच्छ करून सुरू करा - युवासेनेची मागणी 

डोंबिवली पूर्वेतील  ह.भ.प. सावळाराम म्हात्रे महाराज क्रिडा संकुलातील तरण तलाव गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने ते पुन्हा स्वच्छ करून सुरू करण्याची मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. युवासेनेचे जिल्हाधिकारी तथा माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी आशुतोष सिंह यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.  कोवीडमूळे लागू केलेले बरेचसे निर्बंध शासनाने शिथिल करत नागरिकांना दिलासा दिला आहे. राज्य शासनाने क्रिडा आणि क्रिडाप्रकरांसाठी असणारे निर्बंधही कमी केले असून यामध्ये तरण तलावाबाबतच्या निर्बंधांचाही समावेश आहे. राज्य शासनाने सशर्त नियमावलीनूसार तरण तलाव सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामूळे गेल्या दिड वर्षापासून बंद असणाऱ्या राज्यातील इतर तरण तलावांप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील तरण तलाव सुरू करण्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे. त्यामुळे डोंबिवली क्रिडा संकुलातील हा तरण तलाव केडीएमसी प्रशासनाने लवकरात लवकर स्वच्छ करावा आणि नागरिकांना खुला करून देण्याची मागणी उपजिल्हाधिकारी आशुतोष सिंह यांनी केली आहे. -------