Now Loading

विलीनीकरणा ठाम, सरकारकडून पगारवाढीची हमी

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपावरील तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने दोन पावले पुढे टाकत विविध श्रेणीनुसार वेतनवाढीची तयारी दर्शवली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज बुधवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली. तिथेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या पगारवाढीच्या प्रस्तावावर रात्रभर चर्चा करून, उद्या गुरुवारी एस टी. संपाबाबत आमची भूमिका जाहीर करू, असे या कामगारांचे नेतृत्त्व करणारे भाजपाचे नेते सदाभाऊ खोत तसेच गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केली.