Now Loading

कल्याण मध्ये गटारी व सांडपाणी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील गल्लीबोळात घाणीचे साम्राज्य वाढले असून, गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. या मुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यवसायिक व परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात गेले काही दिवसांपासून डेंगू मलेरिया व इतर तापाचे रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यासाठी महानगरपालिका विशेष मोहीम राबवत असल्याचा दावा करत आहे मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात अनेक ठिकाणी नाले , गटर साफ-सफाई न झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे अशाच प्रकारे कल्याण पश्चिमेतील अधरवडी चौक परिसरात मुख्य रस्त्यावर चेंबरचे पाणी नाल्यातून वाहत असल्याने येथील नागरिक हैराण झाले असून या गटारीचे पाणी रस्त्यावर व दुकानात येत असल्याने या परिसरातील व्यापारी व नागरिकांना गटारीतून मार्ग काढत करावा लागत आहे त्याचबरोबर या गटारी च्या दुर्गंधीमुळे अनेक व्यापारी व नागरिक आजारी पडले असून त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न उपस्थित असल्याने गरिकांमध्ये महानगरपालिकेच्या विरोधक संतापाचे वातावरण आहे