Now Loading

अजनीत भांडण सोडवण्याच्या वादातुन दोन गटांत तुळुंब हाणामारी

फिर्यादी जितेंद्र बिसेन (वय २०, रा.हुडकेश्वर खुर्द) यांनी अजनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास आरोपी शैलेश उर्फ भुया सुधाकर काळे हा जितेंद्रच्या घरी आला.त्यावेळी जितेंद्र, त्याचा भाऊ आणि मित्र हे भुऱ्याची समजूत काढण्यासाठी त्याच्या घरी गेले. तेव्हा आरोपी भुऱ्या, अविनाश काळे (२३), अजय बागेश्वर (२१) यांनी जितेंद्रला शिवीगाळ केली. त्याचवेळी आरोपी भुयाने घरातील लोखंडी रॉड आणून अपूर्व कांबळे (२०) याच्या डोक्यावर मारून तसेच फिर्यादी जितेंद्र व मित्राला मारहाण केली. आरोपी अजय बागेश्वर याने चाकू काढून जितेंद्रच्या कपाळावर, अपूर्वच्या डोक्यावर मारून त्यास जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी अजय बागेश्वरने अंकितच्या डोक्यावर, अमितच्या उजव्या डोळ्यावर मारून जखमी केले. यावेळी अविनाशने त्याला मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादी जितेंद्र बिसेन यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे. हा प्रकार जेव्हा भुऱ्याचा भाऊ अविनाशला कळला, तेव्हा तो भांडण सोडविण्यास आला.