Now Loading

दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ट्रायसिकल तसेच विविध जीवनोपयोगी कृत्रिम उपकरणाचे वाटप करण्यात आले. स्थानिय पंचायत समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा परिषद सभापती माधव चन्दनखेड़े, सभापती सौ. शारदा आंबटकर, उपसभापती अमोल गायकवाड़, तहसीलदार सतीश मिसाळ, गटविकास अधिकारी दिनेश चौधरी, श्री पडघन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिनांक 19 एप्रिल 2018 ते 23 एप्रिल 2018 या कार्यकाळात एलिम्को या संस्थेमार्फत प्रत्येक तालुक्यात मोजमाप शिबिरे घेण्यात आली होती, त्यातील नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दिव्यांगांच्या सायकलीसह विविध साहित्याचे वितरण करण्यात आले, हिंगणघाट येथे सुमारे 182 ज्येष्ठांना साहित्य वाटप करण्यात आले या योजनेतून बीपीएल कुटुंबातील वृद्धांना आवश्यकतेनुसार विविध उपकरणे पुरविण्यात येतात, एका व्यक्तीस एकापेक्षा अधिक विकलांगता असल्यास वेगवेगळी उपकरणे दिली जातात त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे परावलंबित्व कमी होऊन सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगण्यास त्यांना मदत होते, याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना व्हील चेअर, दाताच्या कवटया तसेच विविध प्रकारच्या अपंगांच्या काठ्या, कर्णयंत्रे यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरुवातीला समाज कल्याण आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, उपस्थित लाभार्थ्यांना त्यांच्या पुढील आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी घनश्याम किरनाके तसेच समाजकल्याण विभागाच्या कर्मचारी चमूने परिश्रम घेतले.