Now Loading

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीन चे रेट पोचले 6650 रुपयावर

हिंगणघाट शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्कैट ॲड मध्ये सोयाबीनच्या दर ६६५० रुपयांवर पोहोचले असून याठिकाणी १० दिवसात जवळपास १ हजार रुपये प्रतिक्विलची वाढ झाली आहे. आज व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ५९०० रुपयांपासून तर ६६५० रुपये प्रतिक्विंटल दर देऊन शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. गेल्याकाही दिवसांपासून सोयाबीनचे दर ५३०० रुपयांच्या जवळपास स्थिर झाले होते. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढले की नाही अशी भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र गेल्या दहा दिवसात सोयाबीनचे दर १ हजार रुपये क्विंटलने वाढल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.