Now Loading

शिवसेना - युवासेना कल्याण पूर्व आयोजित "किल्ले बांधणी स्पर्धा २०२१" व "प्रभाग क्र. ८८ किल्ले बांधणी स्पर्धा" पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात संपन्न!

खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यासाम्राट नगरसेवक श्री. महेश दादा गायकवाड यांच्या आयोजनाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धेला युवकांचा तुफान प्रतिसाद. छत्रपती शिवरायांचा स्वराज्य, शिकवण, विचार आणि वारसा पुढच्या पिढीला देत लहान मुले आणि युवकांना भविष्यात सुजाण नागरिकांमध्ये रूपांतर होण्याची ही पायरी. संस्कृती आणि इतिहास जपत महाराजांच्या घोषणा, शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट हा सोहळा संपन्न. कल्याण पूर्व मधून विजेते स्पर्धक:- प्रथम क्रमांक - ११,००० - किल्ले पद्मदुर्ग, हनुमान कल्याणकर मित्र मंडळ. द्वितीय क्रमांक - ५००० - किल्ले वासोटा, जगदंब मित्रमंडळ खडेगोळवली. तृतीय क्रमांक - ३००० - किल्ले मुरुड जंजिरा, हनुमान नगर कचोरे.त्यांना रोख ३००० देण्यात आले. रोख रक्कमे सोबत आकर्षक भेटवस्तू व सन्मानचिन्ह ही देण्यात आले. संतोष नगर प्रभाग क्र. ८८ मधून विजेते स्पर्धक:- प्रथम क्रमांक - ३००० - द्वारकानगरी यांनी कोंढाणा किल्ला तयार केले द्वितीय क्रमांक - २००० - तिसाईकुंज या मंडळाने विजयदुर्ग तयार केले तृतीय, चतुर्थ, पाचवा - १००० - गोविंद इन्कलेव्ह सोसायटीने प्रतापगड, स्वराज्य मित्रमंडळाने व संतोष नगर मैदान मंडळाने मुरुड जंजिरा साकारले यांना प्रत्येकी भेटवस्तू व सन्मानचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेत एकूण १५० स्पर्धकांनी/मंडळांनी भाग घेतला, प्रत्येकाला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासमयी व्यासपीठावर सौ. विजयाताई पोटे, श्री. शरद पाटील, श्री. हर्षवर्धन पालांडे, श्री. शरद पावशे, श्री. राहुल पाटील, श्री. दिलीप दाखिनकार, श्री. सुभाष ढोणे, सौ. रीना ढोणे, सौ. रोशना पाटील, सौ. स्नेहा जाधव, श्री. भूषण यशवंतराव, कु.रोहित डुंमने, कु. वैष्णवी सोनवणे, कु. धनराज पाटील, कु. शेखर पिसाळ, कु. रत्नेश महाडिक, कु. सुरज पावशे, सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन श्री. प्रशांत बोटे (शाखाप्रमुख), कु. मधुर म्हात्रे (युवासेना शहर सचिव) व तेजस देवकते (युवासेना उपशहर अधिकारी) यांनी केले.