Now Loading

सरकार दिशाभुल करतंय,संप मागे घेणार नाही,सरकाराने काही पण करावं एस टी कर्मचारी आक्रमक विठ्ठलवाडी एस टी डेपो

राज्य सरकराने केलेली पगारवाढ ही दिशाभूल करणारी आहे.सरकारने दिलेली पगारवाढ आम्ही कधीच मागितली नव्हती. आमच्यावर किती ही कठोर कारवाई करा आम्ही संप मागे घेणार नाही.सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेतली, आता पर्यंत त्यांनी दिलेल्या सहकार्य बद्दल धन्यवाद देतो,मात्र हा लढा कर्मचाऱ्यांचा आहे ,कर्मचारि या पुढे देखील आंदोलन सुरू च ठेवतील. मेलो तरी चालेल पण संप सुरूच ठेवणार जो पर्यंत विलीनीकरण होत नाही. अशी भूमिका कल्याण जवळील विठ्ठलवाडी एस टी आगारातील आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.