Now Loading

कोब्रा नागाने सोसायटीवाल्यांची वाट अडविल्याने रहिवाशाने केला पोलिसांना कॉल ..

ठाणे : एका विषारी कोब्रा नागाने हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या रहिवाश्यांनी वाट अडवल्याची घटना घडली आहे. मात्र याघटनेमुळे सोसायटीतील रहिवाश्यामध्ये एकच गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे कोब्रा नागाने वाट अडवून धरण्याने एका रहिवाशाने चक्क स्थानिक पोलीस ठाण्यात कोब्रा नागाने आमची वाट अडवल्याची माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल होऊन सर्पमित्र येईपर्यत या कोब्रा नागावर नजर ठेवून होते. कोब्रा नागाने फणा काढून अडवली येण्या - जाण्याच्या वाट .. कल्याण पश्चिम भागातील खडकपाडा परिसरात रिजन्सी नावाची हायप्रोफाईल सोसायटी आहे. या सोसायटीच्या मुख्य प्रवेश दरवाजाच्या आतील येण्या - जाण्याच्या मुख्य रस्तात काल रात्रीच्या सुमारास कोब्रा नाग अचानक फणा काढून बसला होता. त्यावेळी एका रहिवाशांचे लक्ष फणा काढून बसलेला नाग पाहताच त्याने धूम ठोकली. तर काही वेळातच सोसायटीत कोब्रा नाग शिरल्याची माहिती रहिवाशांनाही मिळाल्याने त्यांनी घाबरून कोब्रा नागाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. तोपर्यत एका रहिवाशाने खडकपाडा पोलीस ठाण्यात कॉल करून कोब्रा नागाची माहिती दिली. त्यामुळे पोलीस पथकही तातडीने सोसायटीत दाखल झाले. त्यांनतर देशपांडे नावाच्या रहिवाशानी सर्पमित्र हितेशला कॉल करून कोब्रा नागाची माहिती दिली. तर सर्पमित्र येईपर्यत पोलीस त्या फणा काढून बसलेल्या नागवर नजर ठेवून होतेच, काही वेळातच सर्पमित्र हितेश घटनास्थळी येऊन त्याने या कोब्रा नागाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले. नाग पडकल्याचे पाहून रहिवाशांनीही सुटकेचा निश्वास घेतला. निर्सगाच्या सानिध्यात सोडून नागाला जीवदान.. हा कोब्रा नाग ५ फुट लांबीचा असून इंडियन कोब्रा जातीचा खूपच विषारी नाग असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली. तर या कोब्रा नागाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगीने पुन्हा निर्सगाच्या सानिध्यात सोडून त्याला जीवदान दिले आहे. हिवाळ्या दिवसात विषारी साप मानवीवस्तीत भक्ष्याच्या शोधात शिरत असल्याच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क करण्याचे आव्हान सर्पमित्र हितेशने केले आहे.