Now Loading

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव चारचाकीच्या धडकेत गंभीर जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सक्करदरा उड्डाणपुलावर मंगळवारी दुपारी घडली.नरेंद्र सहारे (५३, रा. नागपूर) हे २३नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता एमएच ४९/ क्यू ९३९२ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. दरम्यान एमएच १२/ एनई ५००७ क्रमांकाचा आरोपी कारचालक अब्दुल रशीद अब्दुल अजीज (३५, रा. हसनबाग, नागपूर) याने नरेंद्र यांच्या दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.