Now Loading

भाजप आमदार रमेश पाटील यांचं कल्याणात   वादग्रस्त  विधान ज्या अधिकाऱ्यांनी विना परवानगी मंदिर तोडलं त्याला तोडण्याची वेळ आता आलीय - आमदार रमेश पाटील

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील  मच्छीविक्रेत्यांना केडीएमसीकडून परवाना वितरण करण्यास सुरुवात केली आहे . आज मच्छीविक्रेता  परवाना वितरण कार्यक्रम भाजपच्या वतीने कल्याणतील दामोदर हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमासाठी मच्छी विक्रेत्यांनी गर्दी गेली होती .या कार्यक्रमात विधानपरिषदेचे आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील ,आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते . दोन्ही नेत्यांनी आम्ही मच्छी विक्रेत्यांच्या पाठीशी उभी असल्याचं सांगितलं .यावेळी आमदार पाटील यांनी कल्याण मोहने येथिल मंदिरावर केडीएमसी ने  कारवाई केली यामुळे जो वाद झाला त्याबाबत बोलताना ज्या अधिकाऱ्यांनी विना परवानगी मंदिर तोडलं त्याला तोडण्याची वेळ आता आलीय असा वादग्रस्त विधान केलं . कार्यक्रमानंतर आमदार पाटील यांनी मंदिरावर कारवाई अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी असून याबाबत पालिका आयुक्तांना भेटणार असल्याचे सांगितले . भाजप योग्य प्रकारे उत्तर देईल - भाजप आमदार रवींद्र चव्हाण दोन दिवसांपूर्वी भाजपच्या तीन नगरसेवकांनी  शिवसेनेत प्रवेश केला होता तसेच आणखी काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे .याबाबत भाजप आमदार रवींद्र  चव्हाण यांनी विचारल असता त्यांनी येणाऱ्या काळात राजकारण आणि राजकीय घडामोडी या होतच राहतील व त्याच भाजप योग्य प्रकारे उत्तर देईल यात काही शंका नाही अस सांगितले