Now Loading

केज येथून एसटीने आईकडे जात असलेली एक पस्तीस वर्षीय विवाहीता व तिच्या तीन वर्षाचा मुलासह बेपत्ता झाली आहे. केज येथील रोजा मोहल्ल्यात राहात असलेले प्रदीपसिंग बायस यांची 35 वर्षीय विवाहित मुलगी संध्या संजयसिंग राजपुत व तिचा तीन वर्षाचा मुलगा चि. यश याला सोबत घेऊन दि. 28 सप्टेंबर 2021 रोजी ती तिच्या आईकडे कर्नाटक राज्यातील विजापूर येथे जाण्यासाठी माजलगाव-सोलापूर गाडीत बसून गेली; परंतु ती विजापूर येथे पोहोचली नाही. त्या नंतर तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. उंची 5 फूट, रंग गोरा, सडपातळ बांधा, अंगात लाल रंगाची साडी व पिवळे ब्लाउज आहे. या प्रकरणी बेपत्ता विवाहितेचे वडील प्रदीपसिंग बायस यांच्या तक्रारी वरुन केज पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्र. 29/2021 नोंद घेण्यात आली आहे. या प्रकरणी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ हे तपास करीत आहेत. सदर महिला कोणाला आढळून आली किंवा काही माहिती मिळाली तर केज पोलीस स्टेशन फोन नंबर 0225-252238 किंवा तपासी अधिकारी राजू गुंजाळ मोबाईल क्र 9022251664 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केज पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.