Now Loading

दारूसाठी पैशाची मागणी करून सतत त्रास देणाऱ्या पतीला वैतागून पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील शिदोड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला तात्काळ जेरबंद केले आहे. राजश्री रंजीत कदम (३१, रा. शिदोड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. रंजीत यास दारूचे व्यसन आहे. दारूसाठी तो पत्नीकडे सतत पैशाची मागणी करीत असे. पैसे न दिल्यास तिला तो मारहाण करायचा. २३ रोजी दुपारी त्याने तिला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सततच्या जाचास कंटाळून राजश्रीने स्कार्फने घरी पत्र्याच्या अंगलला गळफास लावून आत्महत्या केली. मयत राजश्रीचे वडील जनार्दन चव्हाण (रा. वंजारवाडी) यांच्या तक्रारीवरून रंजीत उद्धव कदम विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास सहायक निरीक्षक योगेश उबाळे करीत आहेत. तिने नकार देताच तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली बीड ग्रामीण पोलिसांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांकडे दिला. गुन्हा नोंद होताच रंजीत कदम यास दि. २३ रोजी ताब्यात घेतले. त्यास दि. २४ रोजी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.