Now Loading

संविधान दिनानिमित्त जयभीम चित्रपट मोफत दाखवणार - सदानंद प्रधान

बीड माजलगाव .देशातील दलितांच्या अन्याय, अत्याचारा विरोधात न्यायालयीन लढाई जिंकुन खरे वास्तव समोर आणलेल्या, जयभीम, चित्रपट आज भारतीय संविधानाच्या म्हणजे २६ नोव्हेंबर रोजी मोठया पडद्यावर मोफत दाखवणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आबेंडकर चळवळीचे उद्यउन्मुख यूवा नेते सदानंद प्रधान यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबबत दिलेल्या प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे की, देशात बहुचर्चित झालेला तसेच होत असलेला जयभीम चित्रपट मोठ्या प्रमाणात चित्रपट गृहात दाखवला जाणार नाही. हे लक्षात घेऊन सामान्य माणसांना अभिव्यक्त व्यक्त करण्यात आले पाहिजे म्हणून माजलगाव शहरातील भीमनगर भागात चित्रपटांसाठी मोठा पडदा लावून तो चित्रपट मोफत दाखवला जाणार आहे. सदरील चित्रपट आज २६ नोव्हेंबर शुक्रवार रोजी च्या रात्री ७:३० वा.दाखवला जाणार असुन तो पहाण्याचे आवाहन सदानंद भैय्या प्रधान मित्र मंडळानी केले आहे.