Now Loading

*केज येथून तेवीस वर्षीय तरुण बेपत्ता*

*केज येथून तेवीस वर्षीय तरुण बेपत्ता* -------------------------------------------------------- *केज येथून तेवीस वर्षीय तरुण मुलगा मुलगा बेपत्ता झाली आहे.* या बाबतची माहिती अशी की, दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी केज येथील रोजा मोहल्ल्यात राहात असलेले मुखीद मुसमिया इनामदार यांचा २३ वर्षीय मुलगा लतीफ उर्फ अरबाज इनामदार व ते चिंचोली पाटी जवळील शेतात काम करीत होते. दुपारी त्यांचा मुलगा लतीफ उर्फ अरबाज इनामदार हा कुणालाही काही न सांगता निघून गेला आहे. त्याचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो आढळून आलेली नाही.  त्याची उंची ५ फूट, रंग गोरा, सडपातळ बांधा, अंगात फिक्कट निळा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅंट आणि पायात बूट आहे. या प्रकरणी बेपत्ता तरुण लतीफ उर्फ अरबाज इनामदार याचे वडील मुखीद इनामदार यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्र. ३७/२०२१ नोंद घेण्यात आली आहे.  या प्रकरणी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ हे तपास करीत आहेत.  बेपत्ता तरुण कोणाला आढळून आला किंवा त्याच्या विषयी काही माहिती असेल तर त्यांनी केज पोलीस स्टेशन फोन नंबर ०२२५-२५२२३८ किंवा तपासी अधिकारी राजू गुंजाळ मोबाईल क्र. ९०२२२५१६६४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केज पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.