Now Loading

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलीसांना गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणणार- देशमुख

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलीसांना गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणणार- देशमुख बीड - महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल भैय्या दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही २६ नोव्हेंबर रोजी पोलीसांना गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणणार असल्याचे पोलीस बॉईज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रात शहीद जवानांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली कार्यक्रम व मशाल रॅलीचे आयोजन करत आलेली आहे. २६ नोव्हेंबर ला जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पोलिसांच्या पाठीशी ठाम उभे राहून मशाल रॅली ही काढणार आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना या मशाल रॅली च्या माध्यमातून महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस पोलिसांसाठी २६/११ च्या हल्ल्यात व कोरोना मूळे शहिद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे. याकरिता सर्वांनी आपापल्या पोलीस ठाण्यात जावुन पोलीस कर्मचारी व अधिकारी दिसतील तिथेत्यांना एकगुलाबाचे फुल देवुन धन्यवाद म्हणायचे आहे. असे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.