Now Loading

मनमानी करणाऱ्या ग्रामसेवकाची तात्काळ बदली करा- काँग्रेस

नाशिक ईगतपुरी :- ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार पेसा कायदा अमलात आल्यानंतर त्याठिकाणी प्रत्येक शासकीय अधिकारी यांचा सेवेतील कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो मात्र अनेक वर्षांपासून सतत एकाच असल्यामुळे शासकीय अधिकारी वर्गाला राजकारण करणे सोपे जाते इगतपुरी तालुक्यातील बोर्ली या ग्रामपंचायतमध्ये एम के पाटील हे ग्रामसेवक सतत अकरा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहेत ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत येते तसेच जास्त दिवस झाल्याने ते न राहता नाशिकहून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येतात त्यामुळे गावचा विकास खुंटला असल्याने त्या ग्रामसेवकाची तात्काळ बदली करा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे,व गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन बदलीची मागणी करण्यात आली आहे यात दलित वस्तीतील कामांविषयी देखील संशय असून संबंधित ग्रामसेवकाची तीस नोव्हेंबर पर्यंत चौकशी करून बदली करण्यात यावी अन्यथा नाशिक जिल्हा काँग्रेस अनु विभागाचे उपाध्यक्ष तथा बोर्ली गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पंडित यांनी उपोषणास बसणार असल्याचे नमूद केले याप्रसंगी काँग्रेसचे इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे, अनु जाती विभागाचे तालुकाध्यक्ष संतोष जगताप, इगतपुरी युवक शहराध्यक्ष गणेश कौटे, सरचिटणीस सोमनाथ भोंडवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.