Now Loading

मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार

मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार सुलभ अंबाजोगाई-येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मुंबईच्या सद्भावना फाउंडेशनने मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुलभ व्हाव्यात यासाठी १२ लाख रुपये किमतीची फेको मशीन भेट दिली. या मशीनचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. अंबाजोगाई चे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे परिसरातील सामान्य रुग्णांसाठी आधारकेंद्र आहे. इथे उपचारासाठी रुग्णांचा मोठा ओढा असतो. तर रुग्णालय प्रशासन ही अत्याधुनिक उपचार देण्यासाठी तत्पर असते.कोरोना काळातही मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी, वसुंधरा सेवा प्रतिष्ठान, भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब, व विविध संस्था व संघटना यांनी रुग्णालयास विविध प्रकारची मदत केली. शासन स्तरावर निधी उपलब्ध होत असला तरी ही प्रक्रिया दिरंगाईची ठरत असल्याने लोकसहभागातून अनेक यंत्रसामुग्री रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आली आहे.रुग्णालयाच्या नेत्र विभागामार्फत दैनंदिन मोतीबिंदू च्या शस्त्रक्रिया होतात.या विभागास अत्याधुनिक नवीन फेको मशीन ची आवश्यकता होती. ही गरज ओळखुनमुंबईच्या सदभाव फाउंडेशनने ही मशीन देणगी स्वरूपात दिली. त्याची किंमत बारा लाख रुपये आहे. देणगीदार यांचा रुग्णालयाच्या बधिरीकरण विभागात सत्कार समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमास देणगीदार निता दोशी, सदभाव फाउंडेशन मुंबई, विजय गायकवाड, समाजसेवा अधीक्षक जी टी रुग्णालय मुंबई. यांच्या हस्ते फेको मशीन आणि हॉस्पिटल बेड संस्थेस दान स्वरुपात देवुन याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, डॉ राकेश जाधव (वैद्यकीय अधीक्षक), डॉ शंकर धपाटे (उपअधिष्ठता), डॉ विश्वजित पवार (उपअधीक्षक,) डॉ. एकनाथ शेळके, डॉ. अभिमन्यु तरकसे, डॉ. अंकुशे, अधिसेवीका भताने,समाजसेवा अधिक्षक रमेश इंगळे, उपस्थित होते. लोकसहभागातून होणारी मदत मौलिक-डॉ. भास्कर खैरे दर्जेदार रुग्णसेवा देत असताना स्वाराती रुग्णालयास शासना सोबत लोकषभागातूनही मोठी मदत मिळते. सामाजिक जाणिवेतून होणारी ही मदत रुग्णांना दिलासा देणारी ठरते. आगामी काळात सामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. अशी ग्वाही अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.