Now Loading

केंद्र शासनाच्या निष्क्रियतेमुळे वाढणाऱ्या महागाईविरुद्ध लातूर काँग्रेसचे जनजागरण अभियान

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून अर्थव्यवस्था उध्वस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार तसेच माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहरांमध्ये लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी या अभियानाची सुरुवात केली आहे . आज शहरातील प्रभाग क्रमांक 18 येथून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा लातूरचे प्रभारी डॉ.जितेंद्र देहाडे आणि सहप्रभारी फरीद देशमुख , शहर जिल्हा अध्यक्ष ॲड किरण जाधव यांच्या प्रमूख उपस्थितीत जनजागरण अभियान निमीत्त प्रभात फेरी काढून अभियान राबविण्यात आले. या फेरीतून प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन केंद्र सरकारच्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली. केंद्र सरकारचे नोटबंदी, जीएसटी, महागाई, सरकारी कंपनी विक्री अशा अनेक धोरणाबद्दल नागरिकांशी संवाद साधून केंद्र सरकारचे हे धोरण देशासाठी किती घातक आहे याबद्दल माहिती देण्यात आली व वाढत्या महागाईस केंद्र शासनाचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याचे नमूद केले. या अभियानामध्ये लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांनी या अभियानाबद्दल उपस्थितांना माहिती देताना सांगितले की हे अभियान संपूर्ण लातूर शहरात प्रत्येक प्रभागात राबवण्यात येत असून प्रभागात प्रभात फेरीद्वारे केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली ची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला उपाध्यक्ष विद्याताई पाटील, सुंदर पाटील कव्हेकर, विजय कुमार साबदे, नेताजी देशमुख,अजगर पटेल, दगडू आप्पा मिटकरी,इम्रान सय्यद, सचिन मस्के, कल्पना मोरे, सुलेखा कारेपुरकर, सिकंदर पटेल, प्रवीण सूर्यवंशी, ॲड.देविदास बोरुळे पाटील, रमेश सूर्यवंशी, पंडीत कावळे, पुनीत पाटिल, अमित जाधव, अकबर माडजे, विजयकुमार धुमाळ, अविनाश बट्टेवार, अभिषेक पतंगे, कुणाल वागज,योगेश देशमुख, रहमान शेख, डॉ.संदीप क्षीरसागर खुद्दुस शेख, जब्बार शेख,अशोक कांबळे, भिमांअण्णा, राहुल घोडके, शक्ती गुरमे, अमोल गायकवाड, आत्माराम शिंदे, राजू ईटकर,प्रशांत शिंदे,आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.